कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा|Goa Rain update Unseasonal showers drizzle over the scorching heat|Dainik Gomantak

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

Goa Rain : हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनेही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. अखेर आज राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आणि उष्म्यामुळे हवालदिल झालेल्यांना दिलासा मिळाला.
Goa Rain
Goa RainDainik Gomantak

Goa Rain :

पणजी, राज्यात वाढत्या उष्म्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लोक अक्षरश: हैराण झाले होते. उष्म्यापासून दिलासा मिळावा, यासाठी अवकाळी पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती.

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनेही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. अखेर आज राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आणि उष्म्यामुळे हवालदिल झालेल्यांना दिलासा मिळाला.

मये, साखळी, खोर्ली, जुने गोवे तसेच इतर भागांत सायंकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यात आज सकाळपासूनच दमट वातावरण होते. सकाळपासूनच पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पान १३ वर

मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. अखेर सायंकाळी ६.३० च्या सुमारास अचानक आकाश काळ्या-निळ्या ढगांनी भरून आले आणि सायंकाळी सातच्या सुमारास प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला.

पेडणे तालुक्यात आज संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पावसाची रिपरिप सुरू झाली. अधूनमधून ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे फोंडा तालुक्यात लोकांची धांदल उडाली. काही ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कुंडई येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने एक दुचाकीस्वार या झाडात अडकला; पण बालंबाल बचावला.

Goa Rain
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

मराठवाडा ते केरळदरम्यान ट्रफ्स निर्माण झाले आहेत. केरळमध्ये चक्रिय वारे निर्माण झाले आहेत. सोबतच, पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. या सर्वांच्या मिश्रणातून सह्याद्री घाटपट्ट्यात ढग निर्माण झाल्याने गोव्यात पाऊस पडत आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यातील काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- नहुष कुलकर्णी,

संचालक, गोवा वेधशाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com