AC Coach Bedsheets: लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये नेहमी सफेद रंगाच्या चादरी का दिल्या जातात, उत्तर माहित आहे का? | व्हायरल News, Times Now Marathi

AC Coach Bedsheets: लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये नेहमी सफेद रंगाच्या चादरी का दिल्या जातात, उत्तर माहित आहे का?

Indian Railway: बहुतांश लाल पल्ल्याच्या रेल्वे वातानुकूलित डब्यांमध्ये आपल्याला प्रवासादरम्यान सफेद रंगाची चादर आणि उशी दिली जाते. रात्रीच्या वेळी या रंगाची चादर अंगावर घेऊन झोपणे काहींना अवघड तर काहींना भयावह वाटते. तसेच या चादरी लगेच मळतात, त्यामुळे सफेद रंगाच्या जागी हिरव्या किंवा निळ्या रंगाचा तसेच तर पर्यायी रंगाचा वापर करावा अशी मागणी अनेक प्रवासी करताना दिसतात,मात्र भारतीय रेल्वेद्वारे सफेद रंगाचीच चादर आणि उशी कव्हर पुरविली जाते, यामागचे नेमके कारण काय आहे? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
why are white bedsheets always given in railway sleeper coaches, know the reason

हुतांश लाल पल्ल्याच्या रेल्वे वातानुकूलित डब्यांमध्ये आपल्याला प्रवासादरम्यान सफेद रंगाची चादर आणि उशी दिली जाते.

Photo : BCCL
why are white bedsheets always given in railway sleeper coaches: आपल्यापैकी प्रत्येकांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी कधी न कधी प्रवास केला असेलच! या प्रवासादरम्यान प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी रेल्वे चादरी आणि उशा पुरविते . खास करून, भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये बेडरोलसह ब्लँकेटची सेवा दिली जाते. हे बेडरोल आणि पिलो कव्हर प्रामुख्याने सफेद रंगाचेच असतात, ज्यामुळे ते लवकर मळतात.असे असून देखील भारतीय रेल्वे सफेद रंगालाच अधिक प्राधान्य देते. असे का? याबद्दल कधी तुम्ही विचार केला आहे का?
बहुतांश लाल पल्ल्याच्या रेल्वे वातानुकूलित डब्यांमध्ये आपल्याला प्रवासादरम्यान सफेद रंगाची चादर आणि उशी दिली जाते. रात्रीच्या वेळी या रंगाची चादर अंगावर घेऊन झोपणे काहींना अवघड तर काहींना भयावह वाटते. तसेच या चादरी लगेच मळतात, त्यामुळे सफेद रंगाच्या जागी हिरव्या किंवा निळ्या रंगाचा तसेच तर पर्यायी रंगाचा वापर करावा अशी मागणी अनेक प्रवासी करताना दिसतात,मात्र भारतीय रेल्वेद्वारे सफेद रंगाचीच चादर आणि उशी कव्हर पुरविली जाते, यामागचे नेमके कारण काय आहे? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाचे बेडशीटच का दिले जातात?

why are white bedsheets always given in railway sleeper coaches
ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाचे बेडशीटच का दिले जातात?
Photo : Shutterstock.com
भारतीय रेल्वे दररोज मोठ्या संख्येने गाड्या चालवते, ज्यासाठी दररोज हजारो बेडशीट आणि उशांचा उपयोग केला जातो, प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशांसाठी पुरवण्यात आलेल्या या गोष्टी एका वापरानंतर दररोज स्वच्छ करण्यासाठी गोळा केले जातात. या वस्तूंच्या साफसफाईच्या प्रक्रियेत मोठ्या बॉयलरसह सुसज्ज असलेल्या विशेष मशीन्सचा वापर केला जातो. ज्यामध्ये 121 अंश सेल्सिअस तापमानात वाफ निर्माण केली जाते. ज्यामध्ये तब्बल 30 मिनिटांसाठी वापरलेले सर्व बेडशीट आणि कव्हर जंतुमुक्त केल्या जातात. या गहन स्वच्छता प्रक्रियेमुळे भारतीय रेल्वेला रंगीत कपड्यांऐवजी पांढऱ्या रंगाच्या चादरी आणि बेडशीट धुणे अधिक सोईस्कर जाते.
why are white bedsheets always given in railway sleeper coaches
पांढऱ्या चादरींना प्रभावीपणे ब्लीच केले जाऊ शकते, त्यांची चमक टिकवून ठेवता येते आणि वारंवार धुतल्यानंतरही हे कापड स्वच्छ, चमकदार निघते.
Photo : BCCL

ब्लीचिंगमुळे रंगीत चादरी फिक्या पडू शकतात

बेडशीट धुण्यासाठी मॅकेनाइज्ड लॉन्ड्री वापरल्या जातात. याप्रकारच्या कठोर वॉशिंग प्रक्रियेसाठी पांढऱ्या चादरी अधिक योग्य आहेत. पांढऱ्या चादरी ब्लीचिंगला चांगला प्रतिसाद देतात, जे निर्जंतुकीकरणासाठीआणि स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उच्च तापमान आणि मजबूत डिटर्जंटच्या संपर्कात येण्यासह कठोर धुण्याच्या प्रक्रियेमुळे रंगीत कपडे फिकट होऊ शकतात किंवा निस्तेज होऊ शकतात. याउलट, पांढऱ्या चादरींना प्रभावीपणे ब्लीच केले जाऊ शकते, त्यांची चमक टिकवून ठेवता येते आणि वारंवार धुतल्यानंतरही हे कापड स्वच्छ, चमकदार निघते. आणि याच कारणामुळे भारतीय रेल्वे पांढऱ्या चादरीची सेवा प्रवाशांना पुरविते. तसेच दुसरे कारण म्हणजे रंगीत चादरीचा वापर केल्यास या धुताना त्यांचा रंग जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे धुवावे लागेल. तसेच या चादरीएकत्र धुतल्यास त्यांचे रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतात.
ताज्या बातम्या
लेखाचा शेवट